झामी चौकातील पालिकेच्या दवाखान्यात कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी

माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील झामी चौक येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे.
अमळनेर येथील सर्वच हॉस्पिटलमध्ये जवळपास ६५ च्यावर रुग्ण दाखल आहेत. त्यांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच   लोकं आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना आजारावरील लस त्वरित घेवून शरीराला सुरक्षा कवच निर्माण करणे आहे.
यात श्रीकृष्णपुरा, शारदा कॉलनी, वड चौक, सावतावडी, बालाजीपुरा, हनुमान नगर, श्रीराम कॉलनी,  शिरूडनाका, झामी चौक, कसाली मोहल्ला, माळी वाडा,रुबजी नगर, यासह इतर भाग झामी चौकातील न. प. दवाखान्याशी जुळले असल्याने याभागातील जनतेसाठी प्रशासनाने कोरोना आजारावरील लस देण्याची सुविधा त्वरित उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून शहरातील लसीकरणाची विभागणी होणून एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही अन् लवकर उपाय योजना होण्यास मदत होईल.
याबाबत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील अन् लोकनियुक्त नगराध्यक्षा  पुष्पलताताई पाटील यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी माजी नगसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *