घराचे हप्ते मागायला गेलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) घराचे हप्ते मागायला गेलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर  तालुक्यातील सोंनखेडी येथील महिला शहरात शिव कॉलनी भागात राहते. ११ रोजी सकाळी ९ वाजता तिच्या घरी महेंद्रा अँड महेंद्रा फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक सुनील अहिरराव यांनी महिलेच्या घरी येऊन तुम्ही घराचे हप्ते फेडले नाहीत ते फेडून टाका म्हणून सांगू लागले. त्यावर महिलेने आम्ही फायनान्सचे कर्ज घेतले नाही असे सांगितल्यावर त्याला राग आला तुम्हाला १३ (२) ची नोटीस काढली असून तुमच्या कुटुंबियास पाहून घेईल, तुमची इज्जत रस्त्यावर काढेन म्हणून बोलून अश्लील शिवीगाळ करून महिलेच्या पतीस मारहाण करून तिचा उजवा हात धरून विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून अनाधिकाराणे घरात प्रवेश , विनयभंग , अश्लील शिवीगाळचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *