अमळनेरमधून साने गुरुजींचा मानवता आणि प्रेमाचा संदेश घेऊन निघाली पुढील प्रवासाला
अमळनेर (प्रतिनिधी)पुनवट (ता. वणी जि. यवतमाळ) येथील प्रणाली विठ्ठल चिकटे (वय-२१) या तरुणीने पर्यावरण संवर्धन सायकल यात्रा काढून संपूर्ण महराष्ट्र भ्रमंती करीत आहे. ती अमळनेरमधून साने गुरुजींचा खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मानवता व प्रेमाचा संदेश घेऊन पुढील प्रवासाला निघाली आहे.
पर्यावरण संवर्धन आणि महिलांचे प्रश्न प्रश्न समजून घेत मानवतेचे संवर्धन , जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने तिने २० ऑक्टोबरला प्रवास सुरु केला आहे. आतापर्यंत तिने विदर्भमध्ये – यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती,अकोला आता वाशिम पुढे बुलढाणा असा विदर्भ पूर्ण झाला असून, जळगाव आणि अमळनेर येथे साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांच्या कडे मुक्काम केला. चेतन सोनार व विद्या सोनार, किशोर महाजन , दर्शना पवार, राही सोनार, अरविंद सराफ यांनी तिचे स्वागत केले. पुढे पूर्ण खान्देश व कोकण मार्गे महाराष्ट्र प्रवास असेल. आतापर्यंत तिने १२२ दिवसात ४९०० किमीचा पल्ला गाठलं आहे.
महाराष्ट्रातील सर्वच बाबींचा येतोय अनुभव
सभोवतालील वाढत प्रदूषण, तापमानवाढ, वातावरण बद्दल, ऋतुचक बद्दल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या आणि समाज ज्या मुल्यामुळे अजूनही मोकळा श्वास घेतो ती मानवता, प्रेम याचा अनुभव घेत, लक्षात घेऊन सद्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा, आणि सरकारी यंत्रणा इथे भेटी देणे व जनजागृती उद्देश माहिती पोचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्या बाबत चर्चा करणे, संवाद साधने जनजागृती करत, पर्यावरण बाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे आदी करत असते.
तीन महिन्याच्या या प्रवासात, सहकार्य आणि प्रतिसाद खूप चांगला मिळतोय
हा प्रवास व्यक्तिगत असून, कुठल्या शासकीय किंवा संस्थे मार्फत निघाली नाही, स्वजबादारीचा प्रवास लोकांकडे खाणे, राहण असते. सोबत आर्थिक मदत सुद्धा लोकच करतात. समाजात खूप चांगली लोक सुद्धा आहे. त्यामुळे तीन महिन्याच्या या प्रवासात, सहकार्य आणि प्रतिसाद खूप चांगला मिळतोय.