जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या संपर्कामुळे आमदार अनिल पाटीलही होम क्वांरटाईन

आरसीपीटीआर व अँटीजेन चाचणी करून अहवाल प्राप्त होईपर्यंत राहणार क्वांरटाईन

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्याच आठवड्यात संवाद यात्रेनिमित्त अमळनेरात येऊन गेलेले  जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांच्या संपर्कात आलेले आमदार अनिल पाटील यांनीही आपली टेस्ट करून घेत होम क्वारंटाईन झाले.
आमदार अनिल पाटील यांनी शुक्रवारी यवतमाळ येथून परतल्यावर आरसीपीटीआर व अँटीजेन या दोन्ही कोरोना चाचणीसाठी स्वॅप देऊन होम क्वारंटाईन झाले. त्यानंतर घरीच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर  शिवजयंतीचे शहरातील सर्व कार्यक्रम रद्द केले. कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त होईस्तोवर होम क्वांरटाईन राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाडळसरे धरण पाहणी करण्यासाठी व राष्ट्रवादी मेळावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री एकनाथ  खडसे हे अमळनेर दौऱ्यावर असताना आमदार पाटील त्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते  यवतमाळ जिल्ह्यात पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांना दोघांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळाल्याने त्यांनी स्वतः कोणता त्रास होत नसला तरी एक स्वतःची आणि जनतेची काळजी म्हणून अमळनेर येथे शुक्रवारी कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल येईस्तोवर क्वारंटाईन राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *