अमळनेर (प्रतिनिधी) डीवायएसपी राकेश जाधव यांच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी अवैध वाळूचा टेम्पो पकडून कारवाई केली आहे. यामुळे अमळनेर तालुक्यात अवैध वाळूची वाहतुक सुरूच असल्याचे उघड झाले आहे.
डीवायएसपी पथकातील पंकज श्यामराव पाटील व संजय पाटील यांनी टेम्पोमधून चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या शाहआलम नगर मधील एजाजोद्दीन कंमरोद्दीन बेलदार याला पकडले. पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात असून तपास ललित पाटील करीत आहेत.