खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात ईच्छापूर्ती गणपती मंदिर, दुर्गा माता मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा

अमळनेर (प्रतिनिधी) गणपति बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणुक काढून पानखिडकी परिसरातील श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर व श्री ईच्छापूर्ती दुर्गा माता मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. मिरवणुकीचा वाडी संस्थांनापासून सुरवात करीत पानखिडकी येथे समारोप करण्यात आला. 
ईच्छापूर्ती गणपती मंदिर हे १५० वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर पहिले मातीच्या भिंतीचे होते. गेल्या कालांतराने येथील असलेली भाविकांची मांदियाळी पाहता असंख्य श्री गणेश भक्तांच्या पुढाकाराने या मंदिराचा जिर्णोद्धार करीत हे भाविकांचे श्रद्धेचे स्थान आहे. याच मंदिराचा दि.१० रोजी रविवारी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा , कलशारोहण वाडी संस्थानचे गादीपती प.पू.प्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी मंदिर सेवेकरी तथा समस्त जय बजरंग मित्र मंडळ, पानखिडकी परिसरातील भाविक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button