अमळनेर(प्रतिनिधी) भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १२ जानेवारी रोजी युवा मोर्चाच्या वतीने युवा दिन साजरा होणार आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व राजमाता जिजाऊ जयंतीचे अवचित्य साधून १२ जानेवारी रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील आणि प्रदेश मंत्री अनिकेत पाटील यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण २० मंडलस्तरावर प्रतिमा पूजन आणि उत्कृष्ट वक्त्यांचे व्याख्यान आयोजित करणे,तसेच मंडल स्तरावर असे युवक ज्यांनी सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य आणि राजकीय व औद्योगिक क्षेत्रात उचांक गाठलेला आहे अश्या युवांचा सत्कार करण्यात येणार आहे.जेणे करून आजच्या युवा पिढीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन पटाची माहिती मिळेल व आजचा युवा हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे व तो युवा देशाच भवितव्य घडवेल असा दृष्टिकोन प्रदेश युवा मोर्चाने डोळ्या समोर ठेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात देखील सर्व मंडलात कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती जिल्हा संयोजक राकेश पाटील यांनी दिली आहे.