पाचशे रुपये व सहा हजार दोनशे रुपयांचे दोन मोबाईल लांबवले
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारातील एका मोबाईल दुकानात चोरट्यांनी हातसफाई केली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
शहरातील आठवडे बाजारात बादल घनश्याम पंजवाणी यांचे समवाद मोबाईल दुरुस्ती दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकानाचा कडी कोंडा तोडून पाचशे रुपये व सहा हजार दोनशे रुपयांचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना १ रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सुनील हटकर करीत आहेत.