राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस दिल्याने केंद्र सरकारचा केला निषेध
अमळनेर (प्रतिनिधी ) गेल्या १५ दिवसात केंद सरकारने गॅस सिलिंडरच्या दारात १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी रविवारी आक्रमक होऊन रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी थापल्या. तसेच राजकीय सुबुद्धीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस दिल्याने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
अमळनेर शहरातील सिद्धिविनायक कॉलनीत रस्त्यावर आंदोलन छेडण्यात आले. गेल्या १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यात सिलेंडर दर वाढीमुळे किचन बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अन्य वस्तूंची ही महागाई वाढली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलं आहे. महिला आघाडीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील प्रदेश सरचिटणीस प्रा. रंजना देशमुख व जि. प. सदस्या जयश्री पाटील जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, शहर उपाध्यक्ष अलका पवार, राजश्री पाटील, शहर सचिव आशा शिंदे यांनी चूल पेटवून गॅस दर वाढीचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.