अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक ठिकाणी शिक्षकांची अनुपस्थिती आढळून येत असून काही ठिकाणी शाळा बंद असल्याचे आढळून आले आहे.
शासनाने गेल्या महिन्यात परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना साथरोग उपाययोजना कार्यक्रमाकरिता संलग्न करण्यात आल्या होत्या. त्यात शिधा वाटप केंद्र, विलगीकरण केंद्र, निरंतर सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या सेवा संलग्नित केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतर
चालू शैक्षणिक सत्रात शाळा अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. तर शासनाने परिपत्रक काढूनशाळेत दररोज ५० टक्के शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना एक दिवसाआड शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र याची देखील काही शाळेत अंमलबजावणी होताना दिसत नाही. तर काही ठिकाणी मात्र शैक्षणिक कामकाज सुरू असून गृहपाठ देणे सुरू आहे. तालुक्यातील गलवाडे झाडी लोण मुडी तरवाडे शिरसाळे ढेकूसीम या गावांना भेटी दिल्या असता ढेकू सिम आणि शिरसाळे येथेही शिक्षिका उपस्थित होत्या. तर तरवाडे आणि गलवाडे येथे शाळा बंद होती. झाडी येथे शिक्षक उपस्थित होते. लोण येथेही शिक्षक उपस्थित होते. तर मुडी येथे शाळेत कुत्रे बसलेले होते.
शिक्षकांना नोटीस पाठवून चौकशी
ज्या केंद्रातील शिक्षक गैरहजर असतील त्या केंद्रप्रमुखांना देखील तंबी दिली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी दिली. तसेच ज्या शाळा बंद असतील तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना नोटीस पाठवून चौकशी करून अहवाल मागवला जाईल, असे सांगिततले.