अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद अभाविपतर्फे अमळनेर येथे ग. स. हायस्कूल येथील आयएमए हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी राकेश जाधव उपस्थित होते. खाशी मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, दिगंबर महाले यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर मंत्री केशव पाटील, सहमंत्री वैभव पाटील, जिल्हा एसएमएस प्रमुख निलेश पवार, जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, महाविद्यालय सहप्रमुख प्रथमेश निकुंभ, शहर विद्यार्थी प्रमुख, वैष्णवी पाटील, गायत्री पाटील, राकेश बोरसे, अक्षय राठोड, अमोल पाटील, प्रितेश पाटील, पवन सातपुते यांनी सहकार्य केले.