अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालातही ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर आता दिवाळी संपल्याने काही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात अमळनेर शहरात २ तर ग्रामीण भागात १ नवीन रुग्ण आहे. तसेच संपर्कात असलेल्या २ रुग्णांचाही समावेश आहे. तर एकूण रुग्ण संख्या ही ४४८८ ऐवढी झाली आहे. तर शुक्रवारी २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४३६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या रुग्णालयात २३ रुग्ण उपचार घेत असून कोरोनाने आतापर्यंत १०३ जणांचा बळी घेतला आहे.