कारवाईत धुळे येथील एका प्रतिष्ठित नागरिकाचाही आहे समावेश
अमळनेर(प्रतिनिधी)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील बाजारात फिरताना मास्क न वापरल्याने आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम न पाळल्याने नगरपालिकेच्या पथकाने दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात धुळे येथील एका प्रतिष्ठित नागरिकाचा समावेश आहे.
कोरोनाचा संसर्ग अजून पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यामुळे खबरदारी घेणे हाच त्याच्यावर पर्याय आहे. त्या दृष्टीने नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यात सोशल डिस्टन्स पाळले नाही म्हणून धुळे येथील सतीश महाले यांना १ हजार रुपये तर मास्क वापरला नाही म्हणून बाबा बागवान यांना २०० रुपये दंड करण्यात आला. नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रांताधिकारी सीमा अहिरे व नपच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी दक्षता म्हणून प्रशासनास सज्ज केले आहे.
२०० ,५००,व १००० रू, दंड प्रमाणे कारवाई
दि. २४ नोव्हेंबरपासून बाजारात फिरताना तोंडावर मास्क न वापरल्यास अथवा सोशल डिस्टन्स न पाळल्यास पालिकेच्या पथकास २०० ,५००,व १००० रू, दंड प्रमाणे कारवाईच्या सूचना केल्या आहेत,त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी स्व रक्षणासाठी आणि गावाच्या हितासाठी वरील नियम अवश्य पाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.