अमळनेर (प्रतिनिधी) बहुतांशी कर्मचारी जुनी पेन्शन योजना व कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या सामूहिक मागणीसह विविध मागण्यांसाठी २६ रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.
या देशव्यापी संपात ग्रामसेवक संघटना ,पंचायत समिती कर्मचारी , एलआयसी कर्मचारी , वीज कर्मचारी , माध्यमिक शिक्षक संघ , शिक्षक भारती संघटना संपात सहभागी झाल्या. याबाबत ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील , दिनेश साळुंखे , नितीन पाटील तर मुख्याध्यापक संघटनांचे अध्यक्ष एम. ए. पाटील , शिक्षक भारतीचे आर. जे. पाटील , टीडीएफचे सुशील भदाणे , माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सुदर्शन पवार, महसूल कर्मचारी संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष दिनेश सोनवणे , तालुकाध्यक्ष भूषण पाटील यांनी कळविले आहे. त्यामुळे शाळा , पंचायत समिती , तहसील कार्यालय बंद असतील.
ही कार्यालये राहतील सुरू
अंगणवाडी कर्मचारी , पालिका कर्मचारी , आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर नाहीत. त्यामुळे त्यांचे व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.