आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेशनकार्ड केले वाटप
अमळनेर (प्रतिनिधी)शासनाचा आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व लोक समन्वय प्रतिष्ठान आणि लोक संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील ५०० आदिवासी कुटुंबांना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी रेशनकार्ड वाटप करण्यात आले. यामुळे या कुटुंबांना त्यांची स्वताची ओळख निर्माण होऊन हक्काचे रेशनही मिळणार आहे.
सानेगुरुजी विद्यालयात कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, उपविभागीय अधिकारी सिमा देवरे, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे , गटविकास अधिकारी संदीप वायाळ, आरोग्य सभापती तथा नगरसेविका राधाबाई पवार, लोकसंघर्ष मोर्चाचे नेते सचिन धांडे, प्रकाश बारेला, माजी उपसरपंच प्रविण माळी (दहीवद) , अनिल माळी, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे रियाज शेख, ओंकार चव्हाण, किशोर ठाकरे (शिंदखेडा) , धनेश ठाकरे (साक्री) , शिवदास सोनवणे (साक्री) , विकास सोनवणे, जयस जिल्हाध्यक्ष, जितेंद्र देसले (दहिवद) , बळीराम पाटील (पिंगळवाडा) , काँग्रेस पक्षाचे संदिप घोरपडे यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना विनामुल्य रेशनकार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक लोक संघर्ष मोर्चा, वीर एकलव्य आदिवासी क्रांती युवा मंडळ डांगर बृ, आदिवासी पारधी विकास परिषदतर्फे पन्नालाल मावळेसह शांताराम सोनवणे, रावसाहेब पवार, मधुकर चव्हाण, अविनाश पवार, किशोर सोनवणे, बन्सिलाल पवार, हंसराज भिल, नितीन साळूंके, सुदाम सोनवणे, बन्सिलाल पवार, गणेश चव्हाण, महेश अहिरे, आप्पा दाभाडे, उमेश मोरे, बालिक पवार, राहूल मोरे, नाथजी महाराज, भैया भिल, हेमंत दाभाडे विशाल मालचे, भुरा पारधी, धनराज पारधी, विशाल भिल विजय सोनवणे, सुनिल चव्हाण गुलाब साळूंके, उदयभान पारधी, ज्ञानेश्वर दाभाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री संतोष बावने साहेब, निरीक्षक राजेंद्र साळुंके साहेब, ना गो पाटील, गंगाधर भाऊसाहेब यांनी सहकार्य केले. सूत्रसंचलन शांताराम सोनवणे यांनी केले. आभार पन्नालाल मावळे यांनी मानले.
या गावातील नागरिकांना मिळाले रेशन कार्ड
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिलेला आहे त्यानुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील जानवे, डांगर बृ. रणाईचे, पिंगळवाडे, चौबारी, अंबासन ढेकु, अमळनेर, गलवाडे, निसर्डी, लोण खु.,धानोरा, दहिवद, अंबारे, कळमसरे, अमळनेर, अमळगाव, गोवर्धन, आर्डी, अंचलवाडी, जवखेडा, पातोंडा, झाडी, दापोरी, लाडगाव, चोपडाई, नंदगाव, मांडळ, ताडेपुरा, येथील पहिल्या टप्प्यातील ५०० रेशनकार्ड तयार करून वाटप करण्यात आले.