पथकाने विना परवाना देशी विदेशी दारूचा साठा जप्त करून तिघांवर केली कारवाई

अमळगाव व शिरसाळे येथे हॉटेल परिसरात एलसीबीने धाड केली धडक कारवाई

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथे दोन ठिकाणी तर शिरसाळे येथील एका हॉटेलवर धाड टाकून एलसीबी  पथकाने देशी, विदेशी अवैध दारूचा साठा जप्त करीत तींघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अनेक मांसाहारी हॉटेल व ढाब्यावर अनधिकृत विना परवाना देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याची चर्चा
होती. त्यामुळे जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोनि बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी सुधाकर लहाले,पोहेका राजेश मेढे,संदीप पाटील,रवी नरवाडे,प्रमोद लाडवंजारी,अविनाश देवरे,राजेंद्र पवार,किरण धनगर,शरद भालेराव,दीपक शिंदें,परेश महाजन,ईशान तडवी आदींनी ही कारवाई केली.सदर कारवाईत माल जप्त करून तिन्ही आरोपींविरुद्ध मारवड पोलिसात मु प्रॉव्हिशन ऍक्ट कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळगाव येथे दोन ठिकाणी धाडी

या कारवाईत अमळगाव येथे जळोद रस्त्यावर हॉटेल अन्नपूर्णाच्या पाठीमागे बखळ जागेत रविंद्र संजय वाल्हे यांच्याकडे बॉक्समध्ये 416 रुपये किमतीच्या देशी दारू टेंगो पंच कंपनीच्या 8 बाटल्या,644 रुपये किमतीच्या गोवा कंपनीच्या 7 बाटल्या,260 रु किमतीच्या मास्टर ब्लेड व्हिस्कीच्या 2 बाटल्या,700 रुपये किमतीच्या आय बी व्हिस्कीच्या 5 बाटल्या असा एकूण 2020 रु चा माल मिळून आला. तसेच अमळगाव येथेच साई प्रसाद हॉटेल जवळ टाकलेल्या छाप्यात जनार्दन तुळशीराम महाजन व 43 रा अमळगाव याच्याकडून 104रु किमतीच्या देशी टेंगो पंच च्या 2 बाटल्या,52 रु किंमतीची संत्रा देशी दारू 1बॉटल,140 रु किंमतीची डीएसपी ब्लॅक व्हिस्की 1 बॉटल,320 रु किंमतीची ब्लेंडर प्राईड व्हिस्कीची ए बॉटल,120 रु किंमतीची ओसी व्हिस्कीची 1 बॉटल,300 रु किमतीच्या मेक डॉवेल व्हिस्कीच्या 2 बॉटल,600 रु किंमतीचा मेकडॉवेल व्हिस्की चा बंफर,आणि 550 रु किंमतीचा प्रीमियम व्हिस्कीचा बंफर असा ऐकूण 2186 रु चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.

शिरसाळे येथे अशी केली कारवाई

शिरसाळे येथे राज हॉटेल परिसरात हॉटेलच्या मागील जागेतून सुदाम शांताराम चौधरी याच्या कडून 2100 रुपये किमतीच्या मेक डॉवेल व्हिस्कीच्या 14 बाटल्या,1820 रुपये किमतीच्या आय बी कंपनीच्या 13 बाटल्या,आणि 650 रुपये किमतीच्या मेक डॉवेल रम कंपनीच्या 5 बाटल्या.असा एकूण 4570 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *