महिला दिवाळीसाठी गेली माहेरी चोरट्यांनी खाली केली तिजोरी

अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीसाठी महिला माहेरी गेल्याची संधी साधत चोरट्यांने घराचा कडी कोंडा तोडून ४० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १५ ते १७ रोजी पिंपळे रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील पिंपळे रोडवर राहणार्‍या मनीषा भूषण पाटील या १५ पासून दिवाळीसाठी माहेरी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून घरातील ४० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले १८ रोजी महिला परत आल्यानन्तर घटना उघडकीस आली महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरत्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कैलास शिंदे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *