अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात सलग तिसर्या दिवशी रविवारी आलेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेणेही आवश्यक आहे. तसेच रविवारी पुन्हा २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
अमळनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चांगलाच घसरला आहे. संसर्ग होण्याचे प्रमाणही शून्यावर आले आहे. रविवारीही शहरासह ग्रामीण भागातील आलेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४४१ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. रविवारी आलेल्या अहवालातही एकही रुग्ण पॉझिटिव्ह आले नाहीत. तसेच २ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या कोविड रुग्णालयात ०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.