अमळनेर (प्राआत्मनिर्भर भारतच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी व चार सह संयोजकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात अमळनेरचे राकेश पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा ग्रामीणच्या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अमळनेरचे राकेश पाटील यांच्यासह सागर भारंबे(रावेर), गिरीश वराळे(शिरसोली), मिलिंद वाणी(चोपडा), योगेश महाजन(धरणगाव) यांच्या जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्त्या करण्यात आल्या.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी ही नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होते.