जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून चोरटय़ाने दान पेटी फोडून रक्कम लांबवली

अमळनेर (प्रतिनिधी) चोरटय़ाने शहरातील स्टेशनरोडवरील जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून दान पेटीतील अंदाजे ५ ते ६ हजार रुपये चोरून नेल्याची घटना ३० रोजी रात्री घडली. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अमळनेर शहरातील जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडले व त्यातील रक्कम चोरून नेली. याप्रकरणी साबीर अली हैदर अली सैय्यद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल असून तपास मोतीलाल साळुंखे करीत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा आढळून आल्याचे समजते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *