अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील शनिवारी आलेल्या अहवालात १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३५ वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. शनिवारी आलेल्या अहवालातही १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात सर्व रुग्ण नवीन असून अमळनेर शहरातील एकही रुग्णांचा समावेश नाही. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकही रुग्णांचा समावेश नाही. खासगी रुग्णालयातील एकाही रुग्णांचा समावेश नाही. तसेच शनिवारी २ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या कोविड रुग्णालयात २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.