नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले निलंबन आदेश
अमळनेर(प्रतिनिधी) नगरपालिकेच्या सफाई कामगार महिला यांना १४ सप्टेंबर २०२० पासून विना अर्ज गैरहजर राहिल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांना निलंबित केले आहे. यासंदर्भात दि. २२ ऑक्टोबर रोजी आदेश काढले आहेत.
निलंबित केलेल्या महिला कर्मचार्याला नोटीस देण्यात आली आहे.संबंधित सफाई कामगारास प्रभाग क्र. ५ मधील तंबोली जिन समोरील सिंधी कॉलनीतील रस्ता साफ सफाईकामी नेमणुक करणेत आलेली आहे,मात्र दिनांक १४ सप्टेंबर २०२० पासून ते आजपावेतो त्या कामावरुन परस्पर विना रजा गैरहजर आहेत, सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांचे खाडे होत आहे. त्याचा व्देष मनात ठेवून निव्वळ मुकादम व अधिका-यांशी दबाव तंत्राचा वापर करुन खाडे भरणे बाबत हुज्जत घालीत असल्याने याबाबत त्यांना वेळोवेळी लेखी व मौखीक सांगुन देखील कामात सुधारणा दिसून येत नाहीत,व स्वता: कामावर येत नाही,याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता, त्यावर समाधानकारक खुलासा न झाल्याने तो मान्य झाला नाही. वास्तविक पाहता, त्यांची कामाची हजेरी वार्ड मुकादमाकडे असतांना इतर कामगारांनाप्रमाणे त्या हजेरीवर जात नाहीत. आल्यावर काम न करता पर्यायी कामगारांकडून अर्धवट कामे करुन परस्पर निघुन जातात.त्या हजेरींवर व कामावर येत नसल्याने गैरहजर असल्यावावत खाडे होत असतात,शहरात कोविड विषाणुचा प्रार्दुभाव असताना महामारीच्या काळात नेमुन दिलेल्या भागात साफ सफाईचे कामे होत नाहीत.
या अधिकारान्वये केले निलंबन
पतीसह त्यांनी हुज्जत घातल्याने अधिका-यांच्या अवमान करणेची बाब कार्यालयीन शिस्तभंग करणारी ठरवून यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ७९ अन्वये दिनांक २२ ऑक्टोबर पासून त्यांना विनावेतन निलंबित करण्यात आले असून याची सेवापुस्तकात नोंद करण्यात आली आहे.