कोरोनामुळे मृतांची सेंच्युरीकडे वाटचाल, तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या चार हजारांवर

नव्याने आढळले ४६ रुग्ण, ६३ रुग्णांची कोरोनावर मात, पुन्हा दोघांचाही मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी आलेल्या अहवालात आणखी ४६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९३ जणांचा बळी गेला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४०२९ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालातही ४६ जणांना कोरोनाची लागन झाल्याने निष्पन्न झाले. त्यात २५ नवीन रुग्णांचा समावेश आहे. यात अमळनेर शहरातील ११ आणि ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच संपर्कात आलेल्या ७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालयात १४ पॉझिटिव्ह आढळले.
तर शुक्रवारी ६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३५७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या कोविड रुग्णालयात ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *