माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन
अमळनेर( प्रतिनिधी)शहरातील फायनल प्लॉट येथे दुकान संकुल बांधकामांचा शुक्रवारी भुमीपुजन सोहळा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते पार पाडला.
यावेळी नगरसेवक राजु संदानशिव, प्रताप शिंपी, भुत बापु, विक्रांत पाटील, शेखा हाजी, फयाज दादा, बाबु सांळुखे, शितल देशमुख, नदीम शेख, जीवन पवार, अभियंता संजय पाटील, राधेश्याम अग्रवाल उपस्थित होते. गेल्या २०१५ पासून हा विषय प्रलंबित होता. पर्यायीने नगरपरिषदेचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावला.
२५ दुकानाचे बांधकाम होऊन पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार
यात तळमजला व पहिलामजल्यावरील असे एकूण २५ दुकानाचे बांधकाम होणार असून बांधकामासाठी ९८,८७,८९८ रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार असून सदर २५ दुकान संकुलाचा उपयोग २५ कुटुंबांचे उपजीवीकेचे साधन म्हणून होणार आहे.