मुडी येथील पांझरा नदीत वाचवा…वाचवा म्हणून आवाज येताच ग्रामस्थांनी बुडणाऱ्याच्या दिशेने घेतली धाव

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथील पांझरा नदीत वाचवा…वाचवा म्हणून आवाज येताच ग्रामस्थांनी काळजी पोटी बुडणाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र तेवढ्यात एका बोटीने त्यांना वाचविण्याचे मदत कार्य पाहून ग्रामस्थ थबकले आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अमळनेर तालुक्यातील मुडी येथील पांझरा नदीच्या काठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूर ,भूकंप , आग ,अपघात आदी प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास काय काळजी घ्यावी , कशी उपाययोजना करावी , उपलब्ध वस्तूंमधील कोणत्या प्रकारचे साहित्य वापरावे  याविषयी मार्गदर्शन केले आणि प्रथमोपचार विषयी माहिती देऊन साहित्याची ओळख करून दिली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे रावळ व एस. डी. आर. एफचे पोलीस निरीक्षक कैलास पवार यांनी प्रशिक्षण देऊन त्यांच्या पथकाने प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड , संजय चौधरी , महेंद्र पाटील , नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक , तलाठी उपस्थित होते.

सोशल डिस्टन्स ठेवून आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांनी गिरवले धडे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  व अमळनेर प्रशासनच्या वतीने पांझरा नदीच्या काठावरील तलाठी , सरपंच , पोलीस पाटील , ग्रामसेवक व मोजक्या लोकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *