खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह तालुक्यात पुन्हा आढळले १२ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या गेली साडेचारशे पार

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात वेगाने वाढताय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात गुरुवारी ९ रोजी पुन्हा १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून तालुक्यातील रुग्णांची संख्या ४५४ झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ११५ रुग्ण जळगाव चोपडा आणि अमळनेर शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अमळनेर तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. लॉकडाऊन सुरू असूनही लोक घराबाहेर पडत आहेत तर दुकानदार चोरी छुपे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे ते कोरोनाला आमंत्रण देत आहेत.
तसेच कोरोना ग्रामीण भागात वेगाने वाढत चालला असून नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे त्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात अद्यापही लोक सोशल डिस्टन्स न पाळता एकत्र बसने , गप्पा मारणे , मास्क न लावणे , सॅनिटायझर व साबणाने हात धुणे या पैकी काहीच करत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

गुरुवारी आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील बहादरवाडी २ , ढेकू रोड १ , मंगरूळ १ असे चार तर नवीन पॉझिटिव्ह आलेले ढेकू रोड १ ,गांधली १, मंगरूळ १ , ढेकू सिम २, बोरसे गल्ली १ , जी एस हायस्कूलच्या मागे २ , बंगाली फाईल १ आदींचा समावेश आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button