स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

महत्वाच्या क्रांती

◾️ हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️ धवल क्रांती : दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️ श्वेताक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ

◾️ नीलक्रांती : मत्स्यत्पादनात वाढ

◾️ पीतक्रांती : तेलबिया उत्पादनात वाढ

◾️ लाल क्रांती : मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️ तपकिरी क्रांती : कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️ गोलक्रांती : बटाटे उत्पादनात वाढ

◾️ क्रांती : मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती : अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती : कांदा उत्पादन’आरोग्यपथ’: आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेत उपलब्धतेसाठी संकेतस्थळ

????आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) ‘आरोग्यपथ’ या नावाने एक राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी संकेतस्थळ कार्यरत केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे व्यासपीठ सेवा पुरविणार.

????कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तिथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून “आरोग्यपथ” नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले आहे.

ठळक बाबी

????महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.

????या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्‍या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

????रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते..

???? मैदान ????
_______________________________________
◾️अतिशय मंद उतार असलेला व उंच सखलपणाचा अभाव असलेला कमी उंचीचा सपाट प्रदेश म्हणजे मैदान होय.*

◾️भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशांपैकी एक असलेल्या दक्षिण भारतीय पठाराचा एक उपविभाग म्हणजेच महाराष्ट्र पठार (दखनचे पठार) महाराष्ट्र होय.*

◾️परंतु महाराष्ट्र राज्य हे वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेमध्ये विभागलेले आहे. जसे महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम पसरलेली सातपुडा पर्वतरांग वसलेली आहे. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला लागून असणाऱ्या अरबी समुद्रामुळे व पश्‍चिम भागात उत्तर-दक्षिण पसरलेल्या उंच पर्वत रांगा सह्याद्रीमुळे ( पश्चिम घाटामुळे) कोकण किनारा (पश्चिम किनारपट्टी) हा एक प्राकृतीक विभाग आहे.*

◾️सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून महाराष्ट्र पठारावर काही उपरांगा विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते.
_______________________________________.

???? घाटमाथा ????
________________________________

सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य शिरोधारेवर असलेला सपाट पठारी प्रदेश याच घाटमाथा असे संबोधतात स्थानिक भाषेत या सडा असे म्हणतात उदा महाबळेश्वर, पाचगणी, कास

________________________________

????महाराष्ट्र पोलिस भराती-प्रश्नमंजुषा????

१. “स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९” अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे?

१. जयपूर ✍️✍️
२. जोधपूर
३. दुर्गापूर
४. अहमदाबाद

२. एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा :

अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे.
ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला.
वरील कोणती विधाने अचूक आहेत.

१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️
४. अ आणि ब दोन्ही नाही

३. मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे.
ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते.
क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते.

१. केवळ अ आणि ब
२. केवळ ब आणि क ✍️✍️
३. केवळ अ आणि क
४. सर्व

४. युनोकडुन कोणता दिवस ‘जागतिक आनंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो?

१. २१ मार्च
२. २४ एप्रिल
३. २३ मार्च
४. २० मार्च ✍️✍️

५. ‘गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार’ च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्ही
४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️

६. आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

१. दीप्ती शर्मा
२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️
३. अंजुम चोप्रा
४. रूमेली धर

७. जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️
२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती
४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक

८. १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी ‘भुमीगत चळवळीत’ भाग घेतला?

अ. डॉ. राम मनोहर लोहिया
ब. जयप्रकाश नारायण
क. पंडित जवाहरलाल नेहरू
ड. एस. एम. जोशी

१. फक्त अ, ब, क
२. फक्त अ, ब, ड ✍️✍️
३. फक्त ब, क, ड
४. अ, ब, क, ड

९. खालीलपैकी कोणी “हिंदू सेवा संघ” ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?

१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️
२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी
३. काँ. देवजीभाई
४. बाळासाहेब खेर

Join : @MaharashtraPoliceRecruitment
१०. खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :
अ. ” आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. ”
ब. ” राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. “

१. विधान अ: दादाभाई नौरोजी, विधान ब: लोकमान्य टिळक
२. विधान अ: लोकमान्य टिळक, विधान ब: दादाभाई नौरोजी
३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️
४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक

११. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.
ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी

१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️
४. अ आणि ब दोन्ही नाही

१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने “भारताची आशा” असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे?

१. गोपाळ कृष्ण गोखले
२. गोपाळ गणेश आगरकर
३. दादाभाई नौरोजी✍️✍️
४. स्वामी दयानंद सरस्वती

१३. खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा यांनी म्हटले आहे?

१. मंत्रिमंडळ
२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️
३. लोकसभा व राज्यसभा
४. वरील सर्व

१४. अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

१. कलम ३३५✍️✍️
२. कलम १७
३. कलम ३४०
४. कलम ३३८

१५. प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?

उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️

आता वाईड बॉलवर मिळणार फ्री-हीट, जाणून घ्या क्रिकेटमधले नवीन नियम.

????करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. मात्र यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने क्रिकेटचा सराव सुरु करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नियम आखून दिले होते.

????यानंतर लॉकडाउन पश्चात क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करणं, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, DRS च्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.

????याचसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येत असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे. हे नियम कोणत्याही क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकीत करणारे आहेत. यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिग बॅश लिगमध्ये आता वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे. याआधी आयसीसीच्या नियमानुसार फक्त नो-बॉलवर फलंदाजाला फ्री-हीट मिळायची.

????याव्यतिरीक्त पहिल्या १० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार १० षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणं असे काही नवीन नियम बिग बॅश लिगमध्ये लागू करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *