अमळनेर शहरासह तालुक्यात शनिवारी पुन्हा ८ रुग्णांचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह

तीन नवीन तर चार कोरोना रुग्णांच्या संपर्कातील, पैलाड येथील मृत ६२ वर्षीय पुरुषाचाही समावेश

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात शनिवारी पुन्हा 8 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यात पैलाड येथील मृत ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सात रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे नवीन असून अन्य चार रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तसेच यात १९ अहवाल हे निगेटिव्ह आले असून अजून ३१ अहवालांची प्रतीक्षा आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही २२१ पर्यंत पोहोचली आहे.  अमळनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्काबरोबरच नवीन रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रशासनावरचा ताण वाढ आहेत. त्यात. पुन्हा सर्व व्यवहार खुले करण्यात आल्यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोणता रुग्ण कोणाच्या संपर्कात आला, हे सांगणे आता कठीण झाले आहे. त्यात शनिवारी पुन्हा सात रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात तीन रुग्ण हे नवीन आहेत. त्यामुळे त्यांची हिस्ट्री काढणे प्रशासनापुढे डोकेदुखी ठरत आहे.

शनिवारी आढळून आलेले रुग्ण असे

पैलाड भागातील 35 वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, राजहोळी चौकातील ५४ वर्षीय पुरूष हे नवीन रुग्ण आढळे आहेत. तर संपर्कातील गांधलीपुरा भागातील ७२ वर्षीय पुरूष, जीवन ज्योती कॉलनीतील ४३ वर्षीय महिला, २० वर्षीय तरूण आणि तालुक्यातील कावपिंप्री येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर पैलाड येथील मृत 62 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अमळनेर तालुक्यातील रुग्णांची अशी आहे स्थिती

अमळनेर तालुक्यात एकूण रुग्ण  २१२ असून कोरोना मुक्त रुग्ण १२२ आहेत. तर मृत रुग्ण २२ असून साध्या उपचार घेणारे ७८ रुग्ण आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *