अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्याच्या शेतातील माती काढून शेतात घाण टाकून त्रास देण्याची घटना तालुक्यातील दहिवद येथील घडली. याप्रकरणी दोन वीट भट्टी चालकांवर अट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र झिंगा पारधी (दाभाडे) रा जे डी सी सी बँक कॉलनी पिंपळे रोड यांच्या शेतातील माती गुलाब शिवा कुंभार (वय ५०) , नामदेव शिवा कुंभार (वय ४५) यांनी नेऊन त्यांच्या बांधाच्या खुणा नष्ट केल्या. तसेच त्यांच्या शेतात केरकचरा , घाण , राख टाकून शेताचे नुकसान केले व त्यांना त्रास दिला म्हणून रामचंद्र पारधी यांच्या फिर्यादीवरून गुलाब कुंभार व नामदेव कुंभार यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम ४४७ ,३३४ , ४२७ व अनुसूचित जाती जमाती प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चोपड्याचे डी वाय एस पी सौरभ अग्रवाल करीत आहेत.