एनडीएची परिक्षा उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे केले प्रशिक्षण पूर्ण
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मेहरगाव येथील भूमिपुत्राची भारतीय सेनेत लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मेहरगाव ता.अमळनेर येथील प्रथमेश प्रविण पाटील यांनी एनडीए (NDA) ची परिक्षा उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे लेफ्टनंट पदाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले.
तसेच त्यांची पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे भारतीय सेनेत लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. सेनेतील या उच्च पदावरील नियुक्ती गावासह तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एका खेडय़ातील मुलाने गाठलेले ध्येय इतरांना प्रेरणादायी असेच आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.