स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?

???? अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.

???? उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.

????नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे.

????अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.

[ ] ▪️ प्रबोधन२०२२च्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे भारताला यजमानपद

????भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

????२०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत.

????भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत.

????‘एएफसी’ महिला फु टबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात याच महिला समितीने भारताच्या नावाची शिफारस के ली होती. अखिल भारतीय फु टबॉल महासंघाला (एआयएफएफ) पाठवलेल्या पत्रात ‘एएफसी’च्या सरचिटणीस डाटो विंडडोर जॉन यांनी म्हटले की, ‘‘२०२२ एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे संयोजनपद आम्ही भारताकडे सोपवत आहोत.’’

???? इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यासंदर्भात NCERT आणि रोटरी इंडिया यांच्यात सामंजस्य करार ????

???? ई-शिक्षणाची प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) आणि रोटरी इंडिया या संस्थेच्यामध्ये डिजिटल माध्यमातून एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार आहे. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असणार आहे.

????कोविड-19 महामारीच्या काळात घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास विनाअडथळा चालू राहावा या उद्देशाने रोटरी इंडीया ह्यूमेनीटी फाउंडेशन आणि NCERT यांनी एकत्र येत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या करारामुळे NCERTचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ई-शिक्षण मार्फत देशभरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेदोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून भारतीय रेल्वेने निर्माण केला नवा जागतिक आदर्श

भारतीय रेल्वेनी पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट वायरची 7.57 मीटर इतकी जास्त उंची असलेले ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतीकृत सेक्शनमध्ये दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे. या परिचालनाची यशस्वी सुरुवात 10 जून 2020 रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोताड स्थानकांपासून झाली.

ठळक बाबी

????संपूर्ण जगात अभूतपूर्व अशी पहिलीच कामगिरी आहे आणि त्यामुळे भारतीय रेल्वेचा नवा हरित उपक्रम म्हणून ‘हरित भारत’ मोहीमेला देखील चालना मिळणार आहे.

????या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय रेल्वेनी जास्त उंचीच्या OHE सेक्शनमध्ये जास्त उंचीवर पोहोचू शकणाऱ्या पेंटोग्राफच्या साहाय्याने दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवणारी पहिली रेल्वे बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

????वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी वेळेत, कमी खर्चात अधिकाधिक पुरवठा करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरते.

भारतीय रेल्वे विषयी

????भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

????भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

????भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

????1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून ‘मध्य रेल’ असा विभाग बनवला. ‘बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे’, सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून ‘पश्चिम रेल्वे’ विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही ‘ईस्टर्न पंजाब रेल्वे’ व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. ‘पूर्व रेल’मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि ‘ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी’ यांचा समावेश होता.

????आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ स्थापन करण्यास मंजुरी

????दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ (Pharmacopoeia Commission for Indian Medicine and Homoeopathy -PCIM&H) याची पुनःस्थापना करण्याला मंजूरी दिली गेली आहे.

???? आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे.

ठळक बाबी

????PCIM&H हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार आहे.
????PCIM&H यासाठी 1975 सालापासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय औषधपद्धती औषधसूची प्रयोगशाळा (PLIM) आणि होमिओपॅथिक औषधसूची प्रयोगशाळा (HPL) या दोन केंद्रीय प्रयोगशाळांचे त्यात विलीनीकरण करण्यात आले.

????वर्तमानात PCIM&H ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. तीनही संस्थांच्या संबंधित पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ आणि आर्थिक संसाधने यांच्या व्यवहार्य आणि योग्य उपयोजनाच्या उद्देशाने हे विलीनीकरण करण्यात आले आहे.

???? आयुष प्रकारच्या औषधांचे प्रमाणीकरण विकसित होण्यास, तसेच औषधसूची व सूत्रे प्रकाशित करण्यास याचा उपयोग होऊ शकणार आहे.

????विलीनीकरणानंतर PCIM&H या संस्थेला सदर मंत्रालयाच्या अंतर्गत पुरेशी व योग्य अशी प्रशासकीय रचना मिळणार असून औषधसूची निर्माण करण्याच्या कामासाठी क्षमताविकास करणे तसेच औषध-प्रमाणीकरण, बनावट औषधनिर्मितीवर नियंत्रण असे अनेक उद्देश यातून साध्य होणार .

विविध व्यवसायात युवांना प्रशिक्षण देण्यासाठी NFLचा ITI सोबत करार.

????केंद्र सरकारच्या “स्किल इंडिया”
उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) या केंद्रीय खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमाने कारखान्याजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत (ITI) करार करीत आहे.

????या कराराच्या अंतर्गत युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित केले जाणार आहे, ज्यामुळे अवजड आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रात असलेली त्यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

????ठळक बाबी…

????पंजाबमधल्या NFLच्या नांगल प्रकल्पाने तरुणांना 12 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी ITI, नांगल या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग योजनेच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्याअंतर्गत ते संस्थेत सैद्धांतिक कौशल्ये आणि NFL नांगल प्रकल्पात प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण घेऊ शकणार.

????lTI संस्थेसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर NFL पंजाब राज्यात असा पुढाकार घेणारी सार्वजनिक क्षेत्रातली पहिली कंपनी बनली आहे.
संस्थांमधून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन ‘कुशल भारत’ अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात असे आणखी पर्याय शोधण्याची कंपनीची योजना आहे.

????राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) विषयी…

????ही एक मिनीरत्न कंपनी आहे. ही भारतातली रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन घेणारी सार्वजनिक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 23 ऑगस्ट 1974 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नोएडा येथे आहे.

????NFLचे नैसर्गिक वायूवर आधारित पाच अमोनिया-युरिया प्रकल्प आहेत. पंजाबमध्ये नांगल आणि भटिंडा प्रकल्प, हरयाणामध्ये पानिपत आणि मध्यप्रदेशात गुणा जिल्ह्यात विजयपूर येथे दोन प्रकल्प आहेत.

????औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) विषयी..

????औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे ही विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण महासंचालक अंतर्गत स्थापन करण्यात आलेली माध्यमिक स्तरानंतरच्या शाळा आहेत. संघटनेची स्थापना 1950 साली झाली.

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

???? राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे. क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील १२ संस्था आणि विद्यापीठ गटात १३ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळाले होते.

???? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही यादी गुरुवारी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण गटामध्ये आयआयटी मद्रास प्रथम स्थानी आहे, तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळूरु दुसऱ्या स्थानी आहे.

???? सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (४), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (२५), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (३०), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (३४), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (५७), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (७३), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (७५), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (९२), मुंबई विद्यापीठ (९५), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (९७), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (९८) या संस्थांचा समावेश आहे.

“आय फ्लोज – मुंबई”: मुंबईसाठी पूर इशारा प्रणाली.

????“आय फ्लोज – मुंबई (IFLOWS-MUMBAI)” ही एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित करण्यात आली आहे.

????या यंत्रणेमुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळासंबधी इशारा मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.

????पुराची पूर्वतयारी म्हणून लोकांना आधीच सतर्क केले जावे, जेणेकरून ते पूर येण्यापुर्वीच त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असावे या हेतूने ही यंत्रणा महत्त्वाची ठरते.

????ठळक बाबी…

????‘आय-फ्लोज’ मॉड्यूलर रचनेवर तयार केले गेले आहे आणि त्यात माहितीचे एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल (घटक) आहेत.

????या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (NCMRWF), भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) या संस्थांनी तयार केलेल्या ‘रेन गेज नेटवर्क’ स्टेशनवरील क्षेत्रीय माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि IMD, महापालिकेद्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

????हवामानाच्या मॉडेलच्या माहितीच्या आधारे, हायड्रोलॉजिकल मॉडेलचा वापर पर्जन्यवृष्टीच्या रूपरेषेत बदल करण्यासाठी आणि नदी प्रणालींना तो प्रवाह प्रदान करण्यासाठी केला जातो.

????हायड्रॉलिक मॉडेलचा उपयोग अभ्यासाच्या क्षेत्रात पुराचे मूल्यांकन करण्यासाठी पाण्याच्या हालचालीची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवाहाच्या गतीची समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो.

????मुंबई समुद्राशी जोडलेले आणि सात बेटांनी मिळून तयार झालेले एक शहर असल्याने शहरावरील भरती आणि वादळाचे परिणाम मोजण्यासाठी हायड्रोडायनामिक मॉडेल आणि वादळ वृद्धी मॉडेलचा उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये शहरातील गटारे शोधण्याची आणि पूरक्षेत्रांचा अंदाज बांधण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे.

????महापालिका आणि IMD, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने NCCRने मिठी, दहिसर, ओशिवरा, पोइसर, उल्हास, तलाव आणि खाडी या सर्व नद्यांमधून बैथीमीटरी माहिती एकत्र केली आहे.

????पुरामुळे होणाऱ्या घटकांच्या असुरक्षा आणि जोखमीची गणना करण्यासाठी GIS तंत्र आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार केली आहे.

????पार्श्वभूमी…

????तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे परिणामी पावसाळ्यात होणाऱ्या बदलांमुळे भारतामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या महानगराला अधूनमधून अनेकदा प्रदीर्घ कालावधीसाठी पुराचा अनुभव आला आहे.

????अलीकडेच 29 ऑगस्ट 2017 रोजी आलेल्या पुरामुळे हे शहर ठप्प झाले होते. यापूर्वी 26 जुलै 2005 रोजी देखील भयंकर पुर आला होता, जेव्हा 24 तासांच्या कालावधीत 100 वर्षांच्या कालवधीत सर्वाधिक 94 सेंटीमीटर पाऊस पडला होता आणि त्यामुळे संपूर्ण शहरच पूर्णपणे अधू झाले होते.

????त्यामुळे, पूरग्रस्त शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारने भू-शास्त्र मंत्रालयाला “IFLOWS-MUMBAI” ही एकात्मिक पूर इशारा प्रणाली विकसित करण्याची विनंती केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *