आठ घरांचे पत्रे उडाली, एका कार वर झाड पडले तर किराणा दुकानाचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात शुक्रवारी १२ रोजी झालेल्या पहिल्याच मान्सूनच्या वादळी पावसाने २४ लाख रुपये नुकसानीचा तडाखा दिला. यात आठ घरांचे पत्रे उडाली. एका कार वर झाड पडून तर किराणा दुकानाचे नुकसान झाले. तर शेतकर्यांनी कापूस लागवड आणि पेरणी सुरू केली आहे.
अमळनेर मंडळात शुक्रवारी सायंकाळी सरासरी फक्त ३६ मिमी पाऊस पडला. मात्र वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी शहर तलाठी मनोहर भावसार याना पंचनाम्याचे आदेश दिले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या नागरिकांचे असे झाले नुकसान
शाहआलम नगरमध्ये आठ घरांचे छत पत्रे उडून कुटुंब उघड्यावर पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यात सुल्तानशाह फकिरशाह यांचे २५ हजार रुपये , सुरभान मोहम्मद खाटीक १२ हजार रुपये , पाकीजाबी हैदरशाह फकीर १५ हजार रुपये ,अक्रमशाह हसनशाह फकीर ३० हजार रुपये , फारुख रफिक मण्यार २० हजार रुपये , सलीम रफिक मण्यार १५ हजार रुपये , अशपाक रफिक मण्यार २० हजार रुपये , शब्बीरशाह नानकशाह फकीर यांचे १५ हजार रुपये तर करण लालचंद सैनानी यांच्या दुकानात पाणी घुसून ५२ हजार १० रुपये किरणांचे नुकसान झाले आणि सर्वात जास्त नुकसान भगवा चौकातील शिबी राम वशिष्ट यांच्या महागड्या कारवर झाड कोसळून सुमारे १२ लाखाचे असे एकूण १४ लाखाचे नुकसान झाले आहे