अव्वाच्या सव्वा किंमतीत मोबाईल विक्री करून पालकांची करताय सर्रास लूट
जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच मोबाइल विक्रेत्यांनाही प्रशासनाने लावावा चाप
अमळनेर (खबरीलाल) कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होईल, हे अद्यापही अनिश्चित असताना शाळांकडून मुलांना मोबाइलवर ऑनलाइन धडे दिले जात आहे. यामुळे पालकांना चांगला अँड्रॉइड मोबाइल खरेदी करणे भाग पडत आहे, मात्र याचाच फायदा उचलत अमळनेरातील मोबाइल विक्रेते आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मोबाईल विक्रेत्यांच्या अशा या लुटारू वृत्तीमुळे पालकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असून मोठे वाद होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच मोबाइल विक्रेत्यांनाही चाप लावावा, अशी मागणी नागरिकांकडू केली जात आहे.
कोरोनाने यंदा सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायाची चिंता सातवय आहेत. तर गोरगरीबांना खान्याची भ्रांत पडली आहे. तर मध्यमवर्गीयांची बाप भिक मागू देईना आणि आई जेऊ घालेना अशी गत झाली आहे. त्यात सर्वांच्याच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. शाळ अजून सुरू होणार नसल्या तरी शाळांना मात्र शैक्षणिक सत्राचे वेध लागले आहे. म्हणूनच त्यांनी आपली आयडेंटिटी टिकवून राहण्यासाठी ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे. प्रत्येकाच्या घरात अँड्रॉइड मोबाइल असता तरी लॉकडाऊमुळे कोणाचा डिसप्ले फुटला आहे. कोणाचा मोबाइल हँग होत आहे, स्पीड नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच शिक्षणात आपली मुले मागे राहू नयेत यासाठी नवा मोबाइल घेण्यासाठी अनेकांचा कल आहे. मात्र अमळनेरातील मोबाइल विक्रेत्यांनी पालकांच्या मजबुरीचा फायदा उचलत आपले उखड पांढरे करणे सुरू केले आहे. अव्वाच्या सव्वा भागात ते मोबाईलची आणि मोबाईलच्या अॅसेसरीची विक्री करीत आहेत. खरे तर येथे लोकांना जगण्याची पडली असताना मोबाईल विक्रेते मात्र मेलेल्याच्या टाळूवरेच लोणी खाण्यासाठी टपले आहेत.
मोबाईल विक्रेते चक्क करताय लिलाव…
अमळनेर शहरातील बरेच मोबाईल दुकानदार लोकांच्या गरजेचा गैर फायदा घेत आहे. मोबाईलच्या किमती पेक्षा जास्तदराने विक्री करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर निर्लज्यपणे काही दुकानदार तर एका गिराहिकाशी व्यवहार करून लगेच दुसऱ्याला फोन लावून त्याचा निलाव करताय. यात जो जास्त पैसे देईल, त्याला मोबाइल देऊन आपली तुंबडी भरून घेत आहेत. एकीकडे लहान मुले घरी ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांमागे तगादा लावत आहे तर दुसरीकडे अशी लूट चालू आहे. अगोदरच लोकांकडे काम नाही, बेरोजगारी वाढली आहे, त्यात पुन्हा अशी लूट होत असल्याने तीव्र संपात व्यक्त होत आहे. यात ग्रामीण भागातील नागरिकांची अधिक फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे.