आमदार अनिल पाटील यांनी चांदवड गाठून ससाणेंच्या अपघाताची घेतली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना युद्धात अमळनेरात चांगली सेवा बजावणारे डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी चांदवड रुग्णालयात धाव घेऊन ससाणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी पोलीस दलातील एक चांगला अधिकारी गमावल्याचे दुःख व्यक्त केले.
या वेळी अपघात कसा घडला याबाबत परिपूर्ण माहिती उपस्थितांकडून जाणून घेतली. व तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना धीर देखील दिला.अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी या कोरोना युद्धात अनेक महिन्यापासून आपले घरदार विसरून नेमणूक असलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत,कधीतरी एखाददोन दिवस रजा काढून कुटुंबाच्या काळजीपोटी ते जात असतात यासाठी प्रवास करावा लागतो मात्र,दुर्देवाने ही घटना प्रवासातच घडली असल्याने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रवासात काळजी घ्यावी, अशी भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.