साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने साने गुरूजींना अभिवादन करून कोरोनावर मात करण्याचा संकल्प करण्यात आला.
यानिमित्ताने नितीन भदाणे यांनी सुंदर अशी रांगोळी काढून आम्ही सगळे अमळनेकर एकजूटीने कोरोनाला पळवून लावू संदेश दिला. या वेळी रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस नियमांचे पालन करत अभिवादन करून पुढे जात होता. सानेगुरुजींची शिकवण अजूनही अमळनेकर विसरले नाहीत आणि विसरणारही नाहीत. संकटकाळी देखील अमळनेरमध्ये एकोपा होता. येथील डाँक्टरांनी अधिक ताकद लावून रुग्ण बरे केले. कोरोविषयीची भीती कमी केली. तसेच दोन महिने येथे अन्नदानछत्र चालवले गेले. पोलीस, प्रशासन व सफाईकामगार यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. शिवाय अधिकाधिक लोकांचे रीपोर्ट , गाव स्वच्छता , वेळोवेळी फवारणी केली. अमळनेरातील पत्रकार बंधूनीही योग्य बातम्या पोहोचवल्यामुळे धार्मिक कलह , अफवांना बळ मिळाले नाही. दुधवाटप करणारे, भाजीपाला, किराणा दुकाने, सर्वच योग्य वेळेवर लोकांपर्यंत पोहचले.
विविध जाती धर्माचे लोकांनी आपल्याला भागातील गरीब , गरजूंची जाणीव ठेवत सतत मदतीला उभे राहिले. रक्तदाते थकले नाही. कोणताही भेदभाव न करता रक्तपुरवठा होत राहीला.
या वेळी डॉ. प्रा. अरविंद सराफ, चेतन सोनार, गोपाळ नेवे , प्रा. परेश भाई , अविनाश पाटील , रमेश दाणे , सुंगध बरंठ, दर्शना पवार , मिलिंद वैद्य , चेतन शहा , श्रीराम चौधरी , डॉ. दिनेश पाटील , किशोर महाजन , लकी पवार , प्रथमेश कोठावदे , डॉ. अतूल चौधरी , डॉ. हेमंत कदम , डॉ. प्रशांत देवरे , डॉ. रविंद्र जैन, प्रा. सुनिल पाटील , भारती गाला , संतोष पाटील , प्रा. लीलाधर पाटील , प्रा आर. पी. पवार , चेतन भोई , सिद्धार्थ चव्हाण , रोहिनी धनगर , सलोनी पाटील , प्रवीण गोसावी , प्रा. श्याम पवार , नीलेश पाटील , जे. यू. ठाकरे , वासंती दिघे, राजू फाफोरेकर , डी .के. पेंटर , सोमचंद संदानशिव , पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते.