अमळनेर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाताचे वृत्त कळताच अमळनेर येथील महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी चांदवड येथे धाव घेतली. तसेच ससाणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी दुपारी अमळनेरात धडकताच प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, एपीआय एकनाथ ढोबळे, प्राशसन अधिकारी संजय चौधरी, शरद पाटील ,शहरातील १० ते १२ डॉक्टर व डीवायएसपी कार्यालयातील कर्चाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. तसेच कुटुंबियांचीही भेट घेऊन घटनेबाबत दुःख व्यक्त केले.