अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून कोरोना युद्धात सहभागी महिलांचा “मर्दानी महाराष्ट्राची” प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाकरखेडा पोलीस पाटील कविता रविंद्र पाटील, आरोग्य सेविका अनिता खंडेराव पाटील, आशा स्वयंसेविका पुनम भुषण पाटील, आशा स्वयंसेविका कल्पना दशरथ पाटील, परिचारिका रंजना संतोष चौधरी या महिलांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्यां जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमाताई पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर, महिला प्रदेश सचिव रंजना देशमुख, महिला तालुकाध्यक्षा योजनाताई पाटील, शहराध्यक्षा आशाताई चावरीया, महिला शहर उप्पाध्यक्षा अलका पवार आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा योजनाताई पाटील व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.