अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गुरुवारी आणखी एक जण पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेल्यांचा आरोग्य विभाग शोध घेत आहेत.
अमळनेर शहरासह ग्रामीण भागात बुधवारी तब्बल ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किती रुग्ण येतात याची भीती निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी गांधलीपुरा येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
एकुण २११ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून त्यातील २२ मयत झाले आहेत. त्यामुळे अजूनही संकट टळले असून नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.