स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

⭕️महत्वाच्या क्रांती⭕️

@MaharashtraSpardhaPariksha

????हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादनात वाढ

????धवल क्रांती : दुधाच्या उत्पादनात वाढ

????श्वेताक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ

????नीलक्रांती : मत्स्यत्पादनात वाढ

????पीतक्रांती : तेलबिया उत्पादनात वाढ

????लाल क्रांती : मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

????तपकिरी क्रांती : कोकोचे उत्पादन वाढवणे

????गोलक्रांती : बटाटे उत्पादनात वाढ

????क्रांती : मधाचे उत्पादन

????रजत धागा क्रांती : अंडे उत्पादन

????गुलाबी क्रांती : कांदा उत्पादन

⭕️राज्य ➖ नृत्यप्रकार⭕️

1)    अरुणाचल प्रदेश – बार्दो छम
2)    आंध्र प्रदेश – कुचीपुडी, कोल्लतम
3)    आसाम – बिहू, जुमर नाच
4)    उत्तर प्रदेश – कथक, चरकुला
5)    उत्तराखंड – गढवाली
6)    उत्तरांचल – पांडव नृत्य
7)    ओरिसा – ओडिसी, छाऊ
8)    कर्नाटक – यक्षगान, हत्तारी
9)    केरळ – कथकली
10)    गुजरात – गरबा, रास
11)    गोवा – मंडो
12)    छत्तीसगढ – पंथी
13)    जम्मू आणि काश्मीर – रौफ
14)    झारखंड – कर्मा, छाऊ
15)    मणिपूर – मणिपुरी
16)    मध्य प्रदेश – कर्मा, चरकुला
17)    महाराष्ट्र – लावणी
18)    मिझोरम – खान्तुम
19)    मेघालय – लाहो
20)    तामिळनाडू – भरतनाट्यम
21)    पंजाब – भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22)    पश्चिम बंगाल – गंभीरा, छाऊ
23)    बिहार – छाऊ
24)    राजस्थान – घूमर

???? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक स्तरावर कामगिरी उंचावली ????

◾️क्युएस क्रमवारीत ६५१ ते ७०० स्थानी

◾️क्वॉक्वे रेली सायमंड्स (क्युएस) या संस्थेने २०२१ साठी जाहीर के लेल्या वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिं ग या क्रमवारीत सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ या एकमेव राज्य विद्यापीठाला या क्रमवारीत स्थान मिळवता आले आहे.

◾️जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात क्युएस क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते.

◾️शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक-आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या अशा विविध निकषांवर ही क्रमवारी तयार के ली जाते. त्यामुळे या क्रमवारीकडे जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे लक्ष असते.

◾️वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिं गमध्ये जगातील १ हजार २९ संस्थांचा समावेश आहे.

त्यात
???? पहिल्या स्थानी अमेरिके तील मॅसाच्युसेच्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,

???? स्टॅनफोर्ड विद्यापीठ दुसऱ्या,

????. हार्वर्ड विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे

◾️. देशातील एकाही उच्च शिक्षण संस्थेला पहिल्या शंभर संस्थांत स्थान मिळवता आले नाही.

 ______________________________________

पृष्ठभाग विषाणूरहित करण्यासाठी ARCI आणि मेकीन्स या संस्थांनी तयार केलेले UVC आधारित निर्जंतुकीकरण कपाट

भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन व विकास केंद्र असलेले आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPE च्या निर्जंतुकीकरणासाठी “UV-C किरणांवर आधारित  असलेले निर्जंतुकीकरण कपाट” तयार केले आहे.

दैनंदिन संपर्कामुळे वापरात आलेल्या वस्तूंवर विषाणू सहजपणे आढळतात, जे पुढे शरीराच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत वस्तूंचे निर्जंतुकीकरण होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे.

याचा वापर व्यवसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *