अमळनेरचे डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा नाशिक जवळ अपघातात मृत्यू

वडाले भोईजवळ कार दीडशे फुट दरीत कोसळून झाला अपघात

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा आज गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक जवळ असलेल्या वडाले भोई येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती अमळनेर शहरात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे हे दोन दिवसापूर्वी रजा टाकून आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि नियमित आरोग्य तपासणी करीता ते नाशिक येथे गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने जात असताना वडाले भोई जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. ते स्वतः कार चालवत होते. यात त्याची कार सुमारे १५० फूट दरीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शांत आणि संयमी स्वभावाचे अधिकारी

राजेंद्र ससाणे यांचे पोलिस निरीक्षक पदावरून डीवायएसपीपदी पदोन्नती होऊन नाशिक येथील प्रशिक्षणानंतर ते अमळनेर येथे एक वर्षापूर्वी रूजू झाले होते. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे अधिकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. पोलिस प्रशासनावार त्यांची चांगली पकड होती. अमळनेरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांचे मोलाचे काम होते. त्यांच्या अपघाती निधनाने सवर्त्र हळहळ व्यक्त केले जात आहे.अत्यंत सालस स्वभाव असलेल्या अधिकारींचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *