अमळनेर(प्रतिनिधी) खासगी तसेच बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे तालुक्यातील लोण बु. येथील शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लोण बु. येथील शेतकरी भाईदास लोटन पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी दुपारी ०२.३० वाजता शेतातून घरी आली असता पती भाईदास पाटील यांनी घराच्या छतास दोरखंडच्या सहाय्याने गळफास घेतलेले आढळून आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली.सदर शेतकऱ्यावर खाजगी कर्ज चार ते पाच लाख आणि बँक ऑफ बडोदा मधून पीक कर्ज ८३००० रु घेतले होते.याबाबत विनोद साहेबराव पाटील ( रा. लोण बु) यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.भाईदास पाटील यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा,1 विवाहित मुलगी असा परिवार आहे.