डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरचा भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
अमळनेरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदतर्फे आरोग्य मंत्रीराजेश टोपे यांना अमळनेर प्रांताधिकारी यांच्या द्वारे जळगावं जिल्हरुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटल जळगाव च्या भोंगळ व दुर्लक्षामुळे ऑक्सिजन बंद ठेवल्याने दि. ८ जून रोजी अमळनेर येथील रात्री रविंद्र ओंकार बिऱ्हाडे या कोरोना संशयित रुग्णाचा रात्री 1 वाजता मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानीं केला असून दोषींवर त्वरित कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी ही अमळनेरातील कामगार नेते रामभाऊ संदानशिव , देविदास बिऱ्हाडे, रुपसिंग पारे आदींच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील प्रशासनच जबाबदार असल्याचे संबंधित व्यक्तीचे नातेवाईक आरोप करीत आहे.
वरील बाबी लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी परिषदेचे कार्यध्यक्ष प्रा विजय वाघमारे, प्रा हर्षवर्धन जाधव, नगरसेवक नरेंद्र संदांनशीव, प्रा राहूल निकम, प्रा विजय गाढे, प्रा भुसनर, प्रा सुनिल वाघमारे,सोमचंद संदांनशीव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.