कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कळमसरे पंचायत समिती गणात ”निर्जंतूक” मोहीम

मारवड येथून आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात

बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार आणि पं.स.सदस्या कविता पवार यांचा पुढाकार

अमळनेर (प्रतिनिधी)  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमळनेर तालुक्यातील कळमरे पंचायतीचा संपूर्ण गण निर्जंतुक करण्याची मोहीम बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार व पंचायत समिती सदस्या कविता प्रफुल्ल पवार यांच्या माध्यमातून स्व-खर्चाने राबवण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात मारवड येथून आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात देखील निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली होती. परंतु ग्रामीण भागात ह्यासाठी आवश्यक साधनाची व निधीची कमतरता भासत आहे. हे निदर्शनात आल्यानंतर  स्व.उदय वाघ यांच्या सामाजिक राजकारणाचा आदर्श घेत  बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार व पंचायत समिती सदस्या कविता प्रफुल्ल पवार यांनी  स्व-खर्चाने  निर्जंतुकीकरण मोहीम आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ह्या मोहिमेला मारवड गांवापासून सुरुवात करण्यात आली. या वेळी देविदास पाटील, रवींद्र पाटील, शरद पाटील, उमेश चौधरी, भूषण साळुंखे, पंकज लोहार, वासुदेव साळुखे आदी उपस्थित होते. ही निर्जंतुकीकरण मोहीम संपूर्ण कळमसरे पंचायत समिती गणात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *