खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर येथील कोरोना संशयित वृद्धाचा मृत्यू, जळगावातच अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना 

भविष्यातील धोका ओळखता वैद्यकीय विभाग झाला अलर्ट, वृद्धाच्या अहवालाची प्रतीक्षा


कोरोनाने मृत साळी वाड्यातील महिलेच्या संपर्कात आलेले नामांकित ३ डॉक्टर होम कोरोंटाईन 


अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील कोरोना संशयित ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या वृद्धाचा अंत्यसंस्कार जळगावातच करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाने दिल्या असून अमळनेरातही अलर्ट करण्यात आले आहे. तसेच साळी वाड्यातील मृत महिलेच्या संपर्कात आलेले  अमळनेरात नामांकित ३ डॉक्टर होम कोरोन्टाईन झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांत न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास होणारे कोरोना संशयित ५ रुग्ण स्वॅब घेण्यासाठी जळगाव पाठवण्यात आले होते. त्यापैकी अमलेश्वरनगर मधील ७० वर्षीय  संशयिताचा मृत्यू झाला आहे. त्याचा अंत्यविधी जलगावलाच करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. आरोग्य  विभागाने भविष्यातील धोका ओळखता पूर्व तयारी करून ठेवली आहे. तसेच सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे

न्यू प्लॉट भागातील गल्ली, बोरी नदी पश्चिमेकडे बसस्थानकाच्या पूर्वेकडील भाग बॅरॅकेट्सने सील

दरम्यान, साळी वाड्यातील मृत महिला ही न्यू प्लॉट भागातील एका डॉक्टरकडे तपासणीसाठी गेल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार न्यू प्लॉट भागातील गल्ली सील करण्यात आली आहे. नगरपालिकेने  बॅरॅकेट्स टाकणे सुरू केले आहे. तसेच शहराच्या धुळे चोपडा रस्त्याच्या दक्षिणेकडील आणि बोरी नदीच्या पश्चिमेकडे बसस्थानकाच्या पूर्वेकडे सर्व भाग बॅरॅकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.

मुंगसे येथील महिलेच्या संपर्कातील संशयितांचा अहवाल आले निगेटिव्ह 

मुंगसे येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही मुंगसेसह परिसरातील गावांमध्ये दक्षता घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button