योग प्रचारक कमलेश कुलकर्णी यांनी एस.टी.चे डेपो मॅनेजर यांना दिले मागण्यांचे निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) एस.टी.महामंडळाच्या चालक व वाहकांचा प्रवाश्यांशी सरळ संपर्क येत असल्याने त्यांना कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क व हॅड ग्लोव्हज् तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी योग प्रचारक कमलेश कुलकर्णी यांनी केली आहे.
देशात सर्वत्र कोरोना व्हायरस बद्दल संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारास प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. याबाबतचे निवेदन कमलेश कुलकर्णी यांनी एस.टी.चे डेपो मॅनेजर यांना दिले आर.एस.पाटील यांनी सदर निवेदन स्विकारले व वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात येईल असे सांगितले. निवेदन देण्यासाठी जयेश पाटील, अविनाश पाटील, विकास पाटील,जितेंद्र पाटील, जतिन गोहिल,अनिकेत भामरे, भुषण बिईरे,ॠषीकेश पाटील, अविनाश राजपूत आदींची उपस्थिती होती.