खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

मारवड, नवलनगर, भिलाली येथे स्वच्छता अभियान राबवून १२ ट्रॅक्टर कचरा गोळा

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

अमळनेर (प्रतिनिधी) नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मारवड, नवलनगर, भिलाली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी १२ ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला.
रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात तीन ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील मारवड येथे तीन ट्रॅक्टर कचरा ५८ श्री सहभागाने गोळा करण्यात आला व त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली तर धुळे तालुक्यातील नवलनगर येथे ८३ सदस्यांनी ५ ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तालुक्यातील भिलाली येथे चार ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यात ७९ श्री सदस्य सहभागी झाले होते.
या अभिनयाला सोबत वृक्ष लागवड वृक्षसंवर्धन, बस थांबा पूर्ण व्यवस्था असे अनेक प्रकारची सामाजिक कामे दरवर्षी केले जातात. या स्वच्छता अभियानासाठी मारवडचे सरपंच उमेश साळुंखे, माजी सदस्य उमाकांत साळुंखे, माजी सदस्य उमेश सुर्वे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button