अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथे दोन गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली. ही कारवाई मारवड पोलिसांनी केली असून यात दारु व कच्चे रसायन असा माल जागीच नष्ट केला.
जैतपीर येथे गणेश दशरथ कोळी याच्या गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा मारुन ४८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात हातभट्टी, तयार दारु व कच्चे रसायन असा माल पकडुन जागीच नष्ट केला,
तसेच पांडुरंग हिरामण कोळी याचे गावठी दारु हातभट्टी दारु अड्डयावर छापा मारुन ३६०० रुपयांचा मुद्देमाल त्यात गुळ मिश्रीत कच्चे रसायन, हातभट्टी व तयार दारु असा माल पकडुन जागीच नष्ट केला आहे. दोन्ही आरोपींविरुध्द प्रो.गुरनं. १०/२० व ११/२० प्रमाणे गुन्हे दाखल केले.
ही कारवाई दरम्यान राहुल फुला, सपोनि, पोना फिरोज बागवान, पोना भास्कर चव्हाण, पोना सुनिल अगोणे, पोना सचिन निकम, पोशि सुनिल तेली आणि पोना दिनेश कुलकर्णी असे पोलीस पथक होते व पोलीस पाटील गोविंदा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.