धुळे तालुक्यातील मजुराचा मांडळ  येथील पांझरा नदीपात्रामधे बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील मजुराचा अमळनेर तालुक्यातील मंडळ येथील पांझरा नदीपात्रामधे बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. त्याचा दोन दिवसापूर्वीच बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

मांडळ गावाचे श्रीशनी महात्मा जवळ पांझरा नदीपात्रामधे लालचंद शेना भिल (वय ६०) रा.इंदिरानगर तामसवाडी ता.जि.धुळे हा  मांडळ गावाचे पश्चिमेला नदीपलीकडे मृत अवस्थेत आढळून आला.  लालचंद  हा अंदाजे दोन दिवसांपुर्वी बुडुन मयत झाला आहे. तो शेत मजुरी करण्यास गेला असता तीन-तीन-चार दिवस घरी येत नसे.  त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास राहुल फुला,  किशोर पाटील , प्रकाश साळुखे,  सुनिल अगोणे , विशाल चण्हाण  करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *