अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी शुक्रवारी अवैध धंद्यांविरोधात बेधडकपणे कारवाई करीत छापे टाकले. यात तालुक्यातील शिरसाळे व अमळगाव येथे धाडी टाकून गावठी हटभट्ट्या उध्वस्त करून सट्टा जुगार खेळणाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे या गावात खळबळ उडाली होती.
मारवड हद्दीतील शिरसाळे गावात सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेडकॉन्स्टेबल साळुंखे , विशाल चव्हाण यांनी छापा टाकला. असता रेखाबाई बशीर खाटीक( वय-५२) हिस ८ हजार ४०० रुपयाचे जिवंत गावठी हातभट्टी व कच्चे रसायन साहित्य साधनांसह, बाई नामे सिंधुबाई भिका भिल( वय-५२ हिस) तिच्या स्वतःचा घरामागे मोकळ्या जागेत १५०० रुपयांचे तयार गावठी दारुसह तर सलीम बशीर खाटीक (वय-५७) यास पिंपळे रोडला नाल्यालगत रु.३ हजार रुपयांचे तयार गावठी हातभट्टी दारुसह छापा मारुन पकडले व त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(फ)(ग) प्रमाणे कारवाई केली.
तसेच अंमळगाव येथे ही छापा टाकला असता सुरेश मोहन बोरसे (वय-३८) हा ३८०रु चे जुगार साहित्य साधनांसह व जगदिश माधवराव चौधरी वय-४५ हा रु.६६० रुपयांचे जुगार साहित्यसाधनांसह कल्याण नावाचा मटका जुगार खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचेवर छापा मारुन जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.