प्रताप तत्वज्ञान केंद्रच्या धोकेदायक वळणावरील कोपरा काढून टाकण्यासाठी नागरिक सरसावले

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्रच्या धोकेदायक ( शॉर्प ब्लँड कॉर्नर) वळणावरील कोपरा काढून टाक्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी प्राचार्य, मानद संचालक डॉ. एस. आर. चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदनात म्हटले आहे की, बंगाली फाईल,रामवाडी, अयोध्यानगर,केशवनगर, समता नगर, खाज्यानगर, तांबेपूर भागामध्ये जाणारा मुख्य रस्ता असून येथे दररोज नागरिक लहान मोठया प्रमाणात अॅक्सीडेंडने जखमी होतात. येथून विप्रोचे अवजड वाहने, एस.टी.बसेस व रेल्वे मालवाहतूक ट्रका यांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. तसेच येथून प्रताप हायस्कूल, प्रताप कॉलेजमध्ये येणारे- जाणारे शाळेकरी मुले वावरत असतात. तसेच हा रस्त्या१३ ते १४ खेडे गावांचा मुख्य रस्ता आहे. निवेदनात नगराध्या पुष्पलता साहेबराव पाटील. नगरसेविका शितल राजेंद्र यादव, प्रताप कॉलेज प्राचार्य राणे, प्रताप हायस्कूल मुख्याध्यापक कोळी, व ६५ नागरिकांच्या सहया आहेत. धोकेदायक कोपरा त्वरीत काढावा. अशी विनंती. करण्यात आली आहे.
निवेदन देतांना प्रभाग क्रं १मधील प्रतिष्ठीत नागरीक राजेंद्र शाम यादव ( आण्णा मेजर) प्रा. राजेंद्र बडगुजर, प्रा.डि. डि. पाटील, समाजसेवक सुरेश शेजवळ, सुरेश कदम, गजानन चव्हाण,कालू पठाण,रेल्वे टिकीट निरिक्षक काशिनाथ पाटील, रेल्वे पार्सल ऑफिसर रविंद्र कवेश्वर,सिनेट सदस्य उ. म. वि.दिनेश नाईक ,सैनिक अतूल जाधव, कन्डक्टर दिपक चौधरी, प्रविण गव्हाणे, गोटू महाजन. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *